स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ...

स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ...

 पहा व्हिडिओ

काँक्रीट चे बांधकाम असेल तर ते अधिक मजबूत बनवण्यासाठी आपण त्यामध्ये स्टील चा वापर करतो.
 हे स्टील बार च्या स्वरूपात वापरले जातात. आपण त्याला आपल्या भाषेत सळी सुद्धा म्हणतो . 
काँक्रीट ची लोड  व ताण सहन करण्याची ताकद वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
त्यामुळे आपले बांधकाम अधिक मजबूत राहते व दीर्घकाळ टिकते.

या स्टीलचे मोजमाप व किंमत ही त्याच्या वजनानुसार केली जाते. 
हे मोजमाप क्विंटल किंवा टन मध्ये करतात.
आपल्याला हे स्टील बार
 6 mm ,  8 mm ,  10 mm ,  12 mm ,  16 mm ,  20 mm , 
24 mm ,  32 mm , 36 mm ,  40 mm
 पर्यंत मिळतात .घरगुती  बांधकामासाठी जास्तीत जास्त 20 mm पर्यंत वापरले जातात.
आज आपण या स्टील बारचे लांबीवरून वजन कसे काढायचे हे पाहू.
जर आपल्याकडे स्टील बारची जाडी ( व्यास - D ) असेल तर
 आपण  त्या बारचे वजन सहजपणे मोजू शकतो आपल्याला वजन काट्यावर जायची गरज नाही.
तसेच साईटवर कामासाठी  व अंदाजपत्रक  तयार करण्यासाठी यांचा फायदा होतो.
स्टील बारची जी जाडी किंवा त्याचा जो व्यास  असतो  त्याचा वर्ग घ्यावा  व त्यास 162 ने भागावे  म्हणजे आपल्याला एक मीटर बारचे वजन किलो मध्ये मिळेल.मग आपला बार जितक्या मीटरचा आहे तेवढ्या लांबीने त्या वजनास गुणाकार करावा म्हणजे आपल्याला  संपूर्ण बारचे वजन मिळेल .

सूत्र -   
100 किलो म्हणजे 1 क्विंटल

1000 किलो म्हणजे 1 टन


6 mm स्टील बारचे वजन आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असणारी माहिती आपल्या  Skill in Marathi  या  Youtube Chanel  वर तसेच आमच्या  https://www.skillinmarathi.com या वेबसाईटवर पोस्ट केली जाते.याचा सर्वांनी लाभ घ्यावा . तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करावी.About Us.


 स्किल इन मराठी  - Skill In Marathi 

                                    सध्याच्या काळात शिक्षणापेक्षा जास्त महत्व हे  व्यावहारिक ज्ञानाला  व माणसामध्ये असलेल्या स्किलला आहे. आपण काय शिक्षण घेतले यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचे आहे. 
नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हीसाठी हे महत्वाचे आहे. यासाठी  लागणारी  माहिती  आपल्याला इंटरनेटवर  मिळते पण आपल्या मराठी भाषेत कमी प्रमाणात आहे . या वेबसाईटद्वारे नोकरी , व्यवसाय तसेच इतर व्यावहारिक कामांसाठी लागणारी माहिती आपल्यापर्यंत मराठी भाषेत पोहचवण्यासाठी केलेला एक छोटासा उपक्रम  आहे. 


  Created  By, 
Madhav  Shukla ,Vita 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

Class 1 Post in MPSC Exam in Marathi | MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे | MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते?