काँक्रीटच्या ग्रेड ? ग्रेड नुसार वापर ? काँक्रीट मधील साहित्याचं प्रमाण Different types of concrete grades and their uses

काँक्रीटच्या ग्रेड 

काँक्रीट मधील साहित्यांचे  प्रमाण 

ग्रेड नुसार काँक्रीट चा वापर / उपयोग 

Different types of concrete grades and their uses

काँक्रीटच्या  ग्रेड कोणत्या आहेत ? ग्रेड नुसार त्याचा वापर कुठं केला जातो ? आणि महत्वाचं  म्हणजे ग्रेड नुसार काँक्रीट मधील साहित्याचं प्रमाण किती असत ? याबद्दल माहिती आज आपण घेऊयात. 
काँक्रीट म्हणजे काय आहे आपल्यला माहित असेलच.  सिमेंट वाळू,खडी यांचं पाण्याबरोबर केलेलं प्रमाणबद्ध मिश्रण . याचा वापर आपण बांधकाम करण्यासाठी करत असतो . 
आताच्या बांधकामात काँक्रीटचा वापर  जास्त पाहायला मिळत आहे ,सगळीकडे काँक्रीटच्या बिल्डिंग उभारल्या जात आहे. 

या काँक्रीट चा वापर करुन  बिल्डिंग किंवा बांधकामातील वेगवेगळे भाग बनवले जातात,जस कि कॉलम, बीम,स्लॅब,जिना ,भिंत,जमीन .. 

जेव्हा आपण काँक्रीट बांधकामामध्ये वापरत असतो त्यावेळी बांधकामानुसार त्याची ताकद आपण कमी जास्त ठेवत असतो.अखंड मजबूत जास्त वजन टेंशन सहन करणार बांधकाम करायचं असेल तर जास्त ताकदीचं काँक्रीट तयार करावं लागत ,कमी वजन पेलणार,साधं सिम्पल बांधकामासाठी किंवा काँक्रीट साठी कमी ताकदीचं काँक्रीट तयार केलं जात मग या काँक्रीटची  ताकद ठरते कशी? ती या काँक्रीट च्या ग्रेड नुसार ठरत असते आणि काँक्रीट च्या ग्रेड या त्या मध्ये वापर असलेल्या साहित्याच्या प्रमाणावर ठरत असते 


साहित्याचं प्रमाण म्हणजे काय ?


आपण काँक्रीट तयार करण्यासाठी सिमेंट,वाळू, खाडी हे साहित्य वापरतो.  
काँक्रीट तयार करताना हे साहित्य किती घ्यायचं याच एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे.  
उदाहरणार्थ  1:2:4

यामधील पहिला अंक हा सिमेंटचा असतो .  दुसरा अंक हा वाळूचा  असतो आणि  
तिसरा अंक खडीचा असतो 

सिमेंट : वाळू : खडी    1:2:4    
म्हणजे जेव्हढं सिमेंट घेणार त्याच्या डबल /दुप्पट  वाळू घ्यायची आणि 
जेवढा सिमेंट घेणार त्याच्या चार पट खडी  घ्या 

आता आपण काँक्रीट च्या ग्रेड कोणकोणत्या आहेत ते पाहूया. 

काँक्रीट  ग्रेड    -  M 25 
साहित्याचे प्रमाण   -  1:1:2
वापर / उपयोग -
या ग्रेड चा वापर कठीण,मजबूत अशा काँक्रीट बांधकामामध्ये केला जातो,जास्त वजन पेलण्याची ताकद गरजेची  असते अशा बांधकामामध्ये हि ग्रेड वापरतात .तसेच पाण्याशी संबंधित बांधकामामध्ये या ग्रेडचा वापर होतो . उदा पुलाच  बांधकाम,पाण्याची टाकी,काँक्रीट टाकी ,नदी - ओढ्यातील बांधकाम .... 

काँक्रीट  ग्रेड    -  M 20
साहित्याचे प्रमाण 1:1.5:3 
वापर / उपयोग -
या ग्रेड चा उपयोग मजबूत आर सी सी बांधकामासाठी केला जातो. फुटिंग ,कॉलम ,बीम ,स्टेअरकेस-जिना आर सी सी वॉल , स्लॅब यासाठी हि ग्रेड चांगली आहे .


काँक्रीट  ग्रेड    -  M 15
साहित्याचे प्रमाण  - 1:2:4
वापर / उपयोग -
या ग्रेड चा वापर -   लहान आर सी सी कामांसाठी केला जातो.स्लॅब साठी जास्त वापर होतो ,आर सी सी कामांसाठी हि स्टॅंडर्ड ग्रेड आहे ,पण कॉलम ,बीम,फुटिंग साठी M20 वापरलेली चांगली,बांधकाम लहान असेल तर M15 वापरता येते , मी 15 पेक्षा  कमी ग्रेड मध्ये आर सी सी काम करू नये. पी सी सी कामासाठी याचा वापर करता येतो. काँक्रीट  ग्रेड    -  M 10 
साहित्याचे प्रमाण - 1:3:6
वापर / उपयोग -
या ग्रेड चा वापर पी सी सी कामांसाठी केला जातो , आर सी सी मध्ये हि ग्रेड वापरू नये . बेड काँक्रीट, काँक्रीट जमीन,फुटिंग खालील काँक्रीट ,यासाठी हि ग्रेड चांगली आहे काँक्रीट  ग्रेड    -  M 7.5
साहित्याचे प्रमाण - 1:4:8
वापर / उपयोग -
या ग्रेड चा वापर कमी ताकदीच्या पीसीसी साठी केला जातो.

काँक्रीट  ग्रेड    -  M 5
साहित्याचे प्रमाण - 1:5:10
वापर / उपयोग -
M5 ही  ग्रेड  शक्यतो बांधकामात जास्त वापरली जात नाही, एकदम कमी ताकदीच्या  पीसीसी साठी हि ग्रेड वापरली जाते. याची आकडा मजबुतता  खूपच कमी असते. 
काँक्रीट संबधी महत्वाची माहिती -


आर सी सी कामांसाठी M15 पुढील ग्रेड चा वापर करावा .

पी सी सी कामांसाठी M10  हि ग्रेड चांगली आहे. 

सिमेंट , वाळू ,खडी या साहित्याबरोबर पाण्याचे प्रमाण हि योग्य असावे ,काँक्रीट मध्ये कामानुसार / काँक्रीट च्या वापरानुसार पाणी मिक्स करावे. ( एक पोते  सिमेंट साठी 25 लिटर )

काँक्रीट चे मिक्सिंग व्यवस्थित करून घ्यावे . 

जर हाताने काँक्रीट मिक्स करणार असाल तर 10 टक्के सिमेंट जास्त वापरा . 

काँक्रीट तयार केल्यानंतर ३० मिनिटाच्या आत त्याचा वापर करा जास्त वेळ  ठेऊ नका. 

काँक्रीट कॉलम मध्ये ओतताना किंवा जमिनीवर/स्लॅब वर पसताना व्हायब्रेटर  किंवा बार च्या  मदतीने 
खाचून घ्या ,मध्ये पोकळ जागा राहणार नाही याची काळजी घ्या.  

योग्य फॉर्मवर्क ची रचना करा . 

काँक्रीट च्या बांधकामाला योग्य क्लियर कव्हर द्या काम करताना कव्हर ब्लॉक चा वापर करा.


21 ते 28  दिवस काँक्रीट वर पाणी मारा. काँक्रीट चा भाग ओला ठेवा.


Grade of concrete

Quantity of materials in concrete

use of concrete by grade

Different types of concrete grades and their uses

What are the grades of concrete? Where is it used according to grade? And more importantly, what was the ratio of the material in the concrete? Let's find out now.

Important information about concrete -


M15 next grade should be used for RCC works.

M10 is a good grade for PCC work.

Water content should be appropriate with cement, sand, stone and other materials. Mix water in concrete according to work / use of concrete. (25 liters for one bag of cement)

Mixing of concrete should be done properly.

If you are going to mix concrete by hand, use 10 percent more cement.

Use concrete within 30 minutes after preparation. Do not leave too much.

 With the help of vibrator or bar when pouring in concrete columns or on the ground /  slab.

Take care not to leave a hollow in the hole.

 Design the right formwork.

Give proper clear cover to concrete construction Use cover block while working.

curing the concrete for 21 to 28 days. Keep the concrete part wet.टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculat capacity of water tank |

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?