पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ...

इमेज
स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ... व्हिडीओ पहा काँक्रीट चे बांधकाम असेल तर ते अधिक मजबूत बनवण्यासाठी आपण त्यामध्ये स्टील चा वापर करतो.  हे स्टील बार च्या स्वरूपात वापरले जातात. आपण त्याला आपल्या भाषेत सळी सुद्धा म्हणतो .  काँक्रीट ची लोड  व ताण सहन करण्याची ताकद वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे आपले बांधकाम अधिक मजबूत राहते व दीर्घकाळ टिकते. या स्टीलचे मोजमाप व किंमत ही त्याच्या वजनानुसार केली जाते.  हे मोजमाप क्विंटल  किंवा टन मध्ये करतात. आपल्याला हे स्टील बार  6 mm ,   8 mm ,  10 mm ,  12 mm ,  16 mm ,  20 mm ,  24 mm ,  32 mm , 36 mm ,  40 mm  पर्यंत मिळतात .घरगुती  बांधकामासाठी जास्तीत जास्त 20 mm पर्यंत वापरले जातात. आज आपण या स्टील बारचे लांबीवरून वजन कसे काढायचे हे पाहू. जर आपल्याकडे स्टील बारची जाडी ( व्यास - D ) असेल तर  आपण  त्या बारचे वजन सहजपणे मोजू शकतो आपल्याला वजन काट्यावर जायची गरज नाही. तसेच साईटवर कामासाठी  व अंदाजपत्रक  तयार करण्यासाठी यांचा फायदा होतो. व्हिडीओ पहा