काँक्रीटच्या ग्रेड ? ग्रेड नुसार वापर ? काँक्रीट मधील साहित्याचं प्रमाण Different types of concrete grades and their uses
काँक्रीटच्या ग्रेड काँक्रीट मधील साहित्यांचे प्रमाण ग्रेड नुसार काँक्रीट चा वापर / उपयोग Different types of concrete grades and their uses काँक्रीटच्या ग्रेड कोणत्या आहेत ? ग्रेड नुसार त्याचा वापर कुठं केला जातो ? आणि महत्वाचं म्हणजे ग्रेड नुसार काँक्रीट मधील साहित्याचं प्रमाण किती असत ? याबद्दल माहिती आज आपण घेऊयात. काँक्रीट ग्रेड - व्हिडीओ पहा काँक्रीट म्हणजे काय आहे आपल्यला माहित असेलच. सिमेंट वाळू,खडी यांचं पाण्याबरोबर केलेलं प्रमाणबद्ध मिश्रण . याचा वापर आपण बांधकाम करण्यासाठी करत असतो . आताच्या बांधकामात काँक्रीटचा वापर जास्त पाहायला मिळत आहे ,सगळीकडे काँक्रीटच्या बिल्डिंग उभारल्या जात आहे. या काँक्रीट चा वापर करुन बिल्डिंग किंवा बांधकामातील वेगवेगळे भाग बनवले जातात,जस कि कॉलम, बीम,स्लॅब,जिना ,भिंत,जमीन .. जेव्हा आपण काँक्रीट बांधकामामध्ये वापरत असतो त्यावेळी बांधकामानुसार त्याची ताकद आपण कमी जास्त ठेवत असतो.अखंड मजबूत जास्त वजन टेंशन सहन करणार बांधकाम करायचं असेल तर जास्त ताकदीचं काँक्रीट तयार करावं लागत ,कमी वजन पेलणार,साधं सिम्पल बांधकामासाठी किंवा काँक्रीट साठी