घरासाठी जमीन कशी असावी ? वास्तुशास्त्रानुसार जमीन / प्लॉट कसा असावा ?
घरासाठी जमीन कशी असावी ?
वास्तुशास्त्रानुसार जमीन / प्लॉट कसा असावा ?
घरासाठी जमीनीचा आकार हा आयत,चौरस,वर्तुळाकार,किंवा गोमुखी असावा.
जमिनीच्या वरून हाय व्होल्ट च्या विजेच्या तार गेलेल्या नसाव्यात.
जमिनीच्या मध्यभागी विहीर ,मोठा खड्डा नसावा.
जमिनीचा चढ उतार - पूर्व,उत्तर दिशेला उतार व दक्षिण ,पश्चिमेला चढ असावा.
रस्त्याची सोय - घरासाठी जी जमीन घेणार आहे त्या जमिनीपर्यंत सहज
आपल्याला जाता येत यावे.
किमान दोन चाकी गाडी जावी इतका तरी रस्ता असावा.
वीज व पाण्याची सोय - घरासाठी जमीन घेत असताना वीज व पाण्याची सोय असेल
अशा परिसरात घ्यावी.
जरी सोय नसल्यास ती उपलब्ध करता येईल असा परिसर असावा.
परिसर / अरिया - घरासाठी जमीन घेत असताना चांगल्या एरियात घ्याची. शांत व राहण्यास योग्य असा परिसर असावा.
प्रदूषण,अनैतिक व्यवसाय,गुन्हेगारी,अशांतता,असुरक्षितता
असलेल्या परिसरात घरासाठी जागा अजिबात घेऊ नये .
जमिनीचा इतिहास - पूर्वी त्या जमिनीचा वापर कशासाठी केला आहे याची माहिती घेऊन
मगच जमीन खरेदी करावी, स्मशान ,कबरीस्थान,अनैतिक वापर ,कोर्ट कचेरीचे खटले असलेली
जमीन ,बळकावलेली जमीन असेल तर ती घेऊ नये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा