1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani
1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?
यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात.
जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते. पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला हेक्टर:आर:चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते . 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे आर म्हणजे काय ? आर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात.
आपला पहिला प्रश्न आहे
आर म्हणजे काय ?
आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक आहे .
मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आर मध्ये क्षेत्रफळ काढता येते .
1 आर म्हणजे किती ?
1 आर म्हणजे 100 चौ मी
1 मी x 1 मी = 1 चौ मी
जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो
उदा - 10 मी x 10 मी ची जमीन
यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि
त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर
मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते.
आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ?
जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे
आर = चौरस मीटर / 100
यानंतर महत्वचा प्रश्न आहे
आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ?
1 आर म्हणजे 100 चौ मीटर
जर आपण याचे चौरस फुटामध्ये रुपांतर केले तर आपल्याला 1076. 39 चौ फुट मिळतात .
1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो
म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रुपांतर करण्यासाठी
जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने गुणायचे आणि 1089 ने भागायच.
आपल्याला आर मध्ये मोजमाप मिळेल.
गुंठा = आर x 1076.39 / 1089
जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल तर
आर चे गुंठ्यात रुपांतर करून 40 ने भागायचे कारण 40 गुंठ्याचा एक एकर असतो.
चौरस मीटर = आर x 100
चौरस फुट = आर x 1076.39
गुंठा = आर x 1076.39 / 1089
एकर = आर x 1076.39 / 1089 / 40
1 गुंठा = 1089 चौ फुट
1 आर =1076.39 चौ फुट
1 एकर = 40 गुंठे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा