हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?


1 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर 
चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?


यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात. 

जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला           
चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते. 
पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा  वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला  हेक्टर:आर:चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते .
 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे हेक्टर म्हणजे काय ?  हेक्टर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात. 


आपला पहिला प्रश्न आहे 

हेक्टर म्हणजे काय ?

हेक्टर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक  आहे . 

मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आपल्याया हेक्टर मध्ये क्षेत्रफळ काढता येते .

1 हेक्टर म्हणजे किती ?

1  म्हणजे 10000 चौ मी 

1 मी x 1 मी = 1 चौ मी 

जेव्हा असे 10000 चौ मी होतात त्यावेळी 1 हेक्टर तयार होतो 

उदा -  100 मी x 100 मी ची जमीन 

यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि 

त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर 

मध्ये काढून त्यास 10000 ने भागले जाते. 


पुढील सूत्रांचा वापर करून हेक्टर चे गुंठा,एकर ,चौरस फुट ,चौरस मीटर मध्ये रुपांतर करता येते.

अधिक माहितीसाठी VIDEO पहा.

  


चौरस मीटर = हेक्टर  x 10000 

चौरस फुट = हेक्टर  x 107639

गुंठा =  हेक्टर  x 98.84

एकर = हेक्टर  x 2.471


1 गुंठा = 1089 चौ फुट 

1 आर =1076.39  चौ फुट 

1 एकर  = 40 गुंठे Created by Madhav Shukla ( MS ) © 2020आमचे  Youtube  चॅनेल  SUBSCRIBE करण्यासाठी क्लिक करा . 
टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये