ब्रास मध्ये वाळू कशी मोजावी ? फक्त 2 मिनिटातच शिका- how calculate sand in Brass

आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असणारी माहिती आपल्या  Skill in Marathi  या  Youtube Chanel  वर तसेच आमच्या  https://www.skillinmarathi.com या वेबसाईटवर पोस्ट केली जाते.याचा सर्वांनी लाभ घ्यावा . तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करावी.



ब्रास मध्ये वाळू कशी मोजावी?

ब्रास मध्ये वाळू ,खडी ,मुरूम ,दगड कसे मोजावे ?
पहा आपल्या मराठी मध्ये 
Video पहा 
 आपल्या सर्वाना माहिती आहे की बांधकामाचे कोणतेही काम असो
 जसे की RCC ,PCC ( कॉंक्रीट ) ,वीट बांधकाम ,दगडी बांधकाम ,गीलावाकाम
 यासारख्या अनेक कामांसाठी
 वाळू हे साहित्य खूप महत्वाचे असते.
 ही वाळू दोन प्रकारची असते .
 1. नैसर्गिक  ( नदी ,समुद्र इ पासून मिळालेली ) 
                                                           
                     2. कृत्रिम  ( दगडाचा बारीक चुरा करून तयार केलेली - ग्रीट ) 
वाळू कोणतीही आपल्याला  हे माहिती आहे कि ती ब्रास मध्ये मोजायची असते.
 पण ती ब्रास मध्ये कशी मोजायची याची माहिती सर्वाना नाही. 
वाळू ब्रासमध्ये मोजण्याची साधी सोपी पद्धत आहे यासाठी खुप मोठी कसरत करण्याची काहीच गरज नसते.        

आता ही वाळू  ब्रास मध्ये मोजायची कशी ते पाहू.

Video पहा 






ब्रास हे आकारमानाचे एकक  आहे . गणिती भाषेत आपण घनफळ शब्द ऐकलंच असेल . 
ज्या ट्रक किंवा ट्रॅक्टर मधून आपण वाळू आणतो त्याच्या ट्रॉलीला लांबी ,रुंदी  व उंची असते . 
हे मोजमाप आपल्याला फुटामध्ये घ्यायचे आहे आणि त्याचा  गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला ट्रॉलीचे घनफळ घनफुटामध्ये  मिळेल. 
1 ब्रास म्हणजे 100 घनफूट असते 
म्हणून जे घनफळ आले असेल त्याला  100 ने भागायचे . 
म्हणजे आपल्याला ट्रॉली मध्ये किती ब्रास वाळू आहे ते समजेल . 
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची . ट्रॉलीचे माप  घेताना ट्रॉलीमध्ये जेवढी वाळू आहे तेवढेच घ्यावे विशेषकरून उंची घेताना हि काळजी घ्यावी . 


या पद्धतीने आपण खडी दगड मुरूम यासारखे साहित्य सुद्धा ब्रास मध्ये मोजू शकतो 
कारण जरी साहित्य वेगळे असले तरी ट्रॉली चे आकारमान सारखेच असणार. 
जर ट्रॉली चे आकारमान आयत  किंवा चौरस नसेल तर त्याचे घनफळ वेगवेगळ्या सूत्राने काढावे 
पण शक्यतो ट्रॉली चा आकार हा आयतकारच असतो . त्यामुळे घनफळ काढणे सोपे जाते . 







आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असणारी माहिती आपल्या  Skill in Marathi  या  Youtube Chanel  वर तसेच आमच्या  https://www.skillinmarathi.com या वेबसाईटवर पोस्ट केली जाते.याचा सर्वांनी लाभ घ्यावा . तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करावी.



Created By -
Skill in Marahi 
माधव शुक्ल , विटा 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये