जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?

जमिनीची  स्क्वेअर  मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?


  
यापूर्वी आपण गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी हि माहिती पाहिली होती.
त्यामध्ये जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी? हा प्रश्न खूप 
लोकांनी विचारला होता त्यासाठीच हा आजचा लेख व व्हिडिओ बनवलेला आहे .

तर चला मग शिकूया आपल्या स्कील  इन मराठी मध्ये .....

       जमिनीची मोजणी फुट किंवा मीटर मध्ये करून क्षेत्रफळ चौरस फुट, चौरस मीटर मध्ये आपण काढतो.
पण कागदोपत्री जास्त प्रमाणात मेट्रिक पद्धतीचा वापर केला जातो.म्हणजेच मीटर मध्ये मोजणी 
करून क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये काढले जाते.जमिनीचे नकाशे ,उतारे ,दस्तऐवज किंवा इतर
 कागदपत्रात आपल्याला चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ पाहायला मिळते .पण प्रत्यक्ष व्यवहारात 
आपण जमीन चौरस फूट किंवा गुंठ्यामध्ये मोजतो.


या माहितीचा  व्हिडीओ पहा

आपण एखाद्याला विचारले कि तुमची जमीन किती आहे ? तर आपल्याला समोरची व्यक्ती 
गुंठा किंवा एकर मध्ये सांगते.तसेच बांधकामात सुद्धा स्क्वेअर फुटाचा वापर केला जातो .
त्यामुळे या चौरस मीटरचे गुंठ्यामध्ये तसेच चौरस फुटामध्ये कसे रूपांतर करायचे ते आपण पाहू 

मीटर हे युनिट का वापरले जाते 


 मीटर मध्ये आपण कमीत कमी जागा / अंतर  नकाशामध्ये किंवा कागदपत्रात
 नोंद करू शकतो(0.01 मीटर पर्यंत )  पण  फुट व इंचा मध्ये करणे थोडे अवघड जाते 
त्यामुळे  मीटरमध्ये मोजणी  केली जाते.

चौरस मीटरचे गुंठ्यामध्ये ररूपांतर कसे करायचे हे पाहू 



आपण एक उदाहरण पाहू म्हणजे आपल्याला लक्षात राहील .

समजा आपली जमीन 250 चौ .मी  ( sq m ) आहे तर ती किती गुंठे आहे ?

   
जर स्क्वेअर फूट मध्ये पाहिजे असेल तर 
चौरस मीटर x 10.76
=   250 x 10.76
= 2690 चौ फुट 



या पध्दतीने आपण चौरस मीटर चे गुंठ्यामध्ये तसेच चौरस फुटामध्ये रूपांतर करू शकतो.

इतर व्हिडिओ

गुंठ्यामध्ये जमिनीची मोजणी

गुंठ्यामध्ये जमिनीची मोजणी करा आपल्या मोबाईलवरच










आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असणारी माहिती आपल्या  Skill in Marathi  या  Youtube Chanel  वर तसेच आमच्या  https://www.skillinmarathi.com या वेबसाईटवर पोस्ट केली जाते.याचा सर्वांनी लाभ घ्यावा . तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करावी.







About Us.


 स्किल इन मराठी  - Skill In Marathi 

                                    सध्याच्या काळात शिक्षणापेक्षा जास्त महत्व हे  व्यावहारिक ज्ञानाला  व माणसामध्ये असलेल्या स्किलला आहे. आपण काय शिक्षण घेतले यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचे आहे. 
नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हीसाठी हे महत्वाचे आहे. यासाठी  लागणारी  माहिती  आपल्याला इंटरनेटवर  मिळते पण आपल्या मराठी भाषेत कमी प्रमाणात आहे . या वेबसाईटद्वारे नोकरी , व्यवसाय तसेच इतर व्यावहारिक कामांसाठी लागणारी माहिती आपल्यापर्यंत मराठी भाषेत पोहचवण्यासाठी केलेला एक छोटासा उपक्रम  आहे. 


  Created  By, 
Madhav  Shukla ,Vita 
















या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये