सरकारी नियमानुसार किती मजली बांधकाम करता येते?किती जागेत किती बांधकाम करता येते?
FSI Calculation in Marathi
FSI म्हणजे काय ?
आपल्याला ज्यावेळी नवीन बांधकाम करायचं असतं त्यावेळी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका,महानगरपालिका यांच्या बांधकाम विभागाकडून परवानगीघ्यावी लागते, त्यानंतर आपण बांधकाम सुरू करू शकतो.
शासनामार्फत बांधकामासाठी ठराविक नियम ठरवलेले असतात.बांधकामाची कमाल मर्यादा ठरवून दिलेल्या असतात. किती जागेत किती बांधकाम करायचं हे ठरवून दिलेले असते.
यामध्ये FSI चा वापर केला जातो.
FSI म्हणजे बांधकामाचे क्षेत्र व जमिनीचे क्षेत्र यांचे प्रमाण होय.
FSI = Built-up Area ÷ Area of Plot
आपल्याला FSI शासनामार्फत ठरवून दिलेला असतो.
त्यामुळे FSI कलक्युलेशन करायची गरज नसते.दिलेल्या FSI वरून बांधकामाचे क्षेत्र काढायचे असते.तेवढे बांधकाम आपण करू शकतो.
जर बांधकाम जास्त मजली करायचे असेल तर कमी एरिया चे जास्त मजले आपल्याला करता येतात.
FSI जमिनीचा एरिया ,शहराची लोकसंख्या,लाईट व्यवस्था, शासनाचे नियम-धोरणे यानुसार ठरवला जातो. प्रीमियम टॅक्सेस भरून FSI वाढवून घेता येतो.