घर बांधताना किंवा नवीन बांधकाम करताना अनेक वास्तुशास्त्रीय बाबी लक्षात घेतल्या जातात. त्यातच एक महत्त्वाचा भाग म्हणजे पाण्याच्या टाकीची योग्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार पाण्याची टाकी योग्य दिशेला असेल, तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, समृद्धी येते आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहतं.
या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत –
👉 जमीनिखालील (Underground) वॉटर टँक कुठे असावा?
👉 ओव्हरहेड (Overhead) वॉटर टँकसाठी सर्वोत्तम दिशा कोणती?
वास्तुशास्त्राची शास्त्रशुद्ध माहिती घ्यायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
जमीनिखालील म्हणजेच Underground water tank हा ईशान्य दिशेला असावा. ईशान्य दिशा यासाठी सर्वोत्तम आहे. जर ईशान्य दिशेला शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व या दिशेला असावी.
टेरेसवरील किंवा वरील बाजूची पाण्याची टाकी ही पश्चिम दिशेला असावी. पश्चिम दिशा ही ओव्हरहेड (Overhead) वॉटर टँकसाठी सर्वोत्तम दिशा आहे. जर पश्चिम दिशेला शक्य नसेल तरच पश्चिम वायव्य किंवा पश्चिम नैऋत्य या दिशेला असावी.