1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani
Video पहा 1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात. जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते. पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला हेक्टर: आर: चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते . 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे आर म्हणजे काय ? आर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे ? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात. आपला पहिला प्रश्न आहे आर म्हणजे काय ? आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक आहे . मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आर मध्ये क्षेत्रफळ काढता येते . 1 आर म्हणजे किती ? 1 आर म्हणजे 100 चौ मी 1 मी x 1 मी = 1 चौ मी जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो उद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा