पोस्ट्स

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

इमेज
  हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? 1 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर  चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? पहा व्हिडिओ यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात.  जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला            चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे  एकक  जास्त वापरले जात होते.  पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप  एककाचा   वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला   हेक्टर: आर:चौ मीटर  यामध्ये पाहायला मिळते .   7/12  वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे हेक्टर म्ह णजे काय ?  हेक्टर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे ? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात.  आपला पहिला प्रश्न आहे  हेक्टर म्हणजे काय ? हेक्टर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक  आहे .  मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आपल्याया हेक्टर मध्ये क्षेत्रफळ काढता येते . 1 हेक्टर

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

इमेज
Video पहा    1 आर  म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात.        जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला            चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे  एकक  जास्त वापरले जात होते. पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप  एककाचा   वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला  हेक्टर: आर: चौ मीटर  यामध्ये पाहायला मिळते . 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे आर म्हणजे काय ? आर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे ? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात.   आपला पहिला प्रश्न आहे  आर म्हणजे काय ? आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक  आहे .  मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आर मध्ये क्षेत्रफळ काढता येते . 1 आर म्हणजे किती ? 1 आर म्हणजे 100 चौ मी  1 मी x 1 मी = 1 चौ मी  जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो  उद

विटेची क्वॉलिटी,ताकद कशी चेक करावी | Brick Test in marathi

इमेज
  how to cheack quliety of brick brick quliety cheack पहा व्हिडीओ Brick test Brick quality Brick test on site Brick test on field Bricks Brick work Brick work imp point Brick wall supervision Construction Civil engineering Civil engineer assistant

वीट बांधकाम करताना कोणती काळजी घ्यावी? important points in Brick construction

इमेज
 वीट बांधकाम करताना कोणती काळजी घ्यावी? important points in Brick construction पहा Video  वीट बांधकाम महत्वाचे मुद्दे | Brick wall imp points | Brick wall 1.वीट बांधकाम करण्यासाठी लागणारे जे साहित्य असेल यामध्ये विटा ,सिमेंट ,वाळू ,पाणी यांची क्वालिटी चेक करून घ्यावी. 2. वीट बांधकामासाठी जो मोर्टर ( सिमेंट + वाळू ) तयार केले जाते त्याच प्रमाण योग्य असावे. 3. विटा बांधकामात वापरण्यापूर्वी एक ते 2 तास पाण्यात भिजत ठेवा. 4. भिंत बांधण्यासाठी योग्य बॉंड चा वापर करा. जसे कि इंग्लिश ,फ्लेमिश    (4 इंच ,6 इंच 9 इंच ,12 इंच.... बांधकाम )  5. विटांचे जोड ( सांधे ) Joint कधीही उभ्या एका रेषेत येवू देऊ नका. 6. सिमेंट वाळूचा मसाला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या.तयार केलेले मिश्रण 30 मिनिटाच्या आत वापरा. 7. विटांची रचना करताना लेव्हल चा वापर करा.त्यासाठी लाईन दोरी , स्पिरीट लेव्हल ,ओळंबा चा वापर करा . 8 .एक मीटर पेक्षा जास्त उंचीचे बांधकाम एका दिवसात करू नका. 9. बांधकाम झाल्यानंतर कमीत कमी 7 दिवस क्युरिंग करा ( पाणी मारणे ) 10.बांधकाम झाल्यानंतर त्यचे मोजमाप घ्या ( घनमीटर ( cu.m ) किंवा ब्रास मध

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

इमेज
 मोबाइल चा वापर करून जमिनीचे आकारमान मोजण्याची सोपी पद्धत  - गुंठा,एकर,हेक्टर,आर   पहा आपल्या मराठीमध्ये | GPS Area calculator App जमिनीचा एरिया सिलेक्ट करून आकारमान किती आहे हे आपण यामध्ये पाहु शकतो .यामध्ये आपल्याला चौरस फुट .चौरस मीटर , गुंठा,एकर,हेक्टर ,आर या एककामध्ये आपल्याला आकारमान मिळते .या app चा वापर करून  आकारमान कसे काढायचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.त्यासाठी Video अवश्य पहा. Video पाहण्यासाठी क्लिक करा ... Watch Video app डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App https://play.google.com/store/apps/details?id=kbk.maparea.measure.geo Area calculator Area calculation Area calculation app Jmin mojani kashi karavi शेत जमीन मोजणी Jmin mojni जमीन मोजणी, Jamin mojani app Area calculator Gps area calculator Land area calculator गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी जमीन मोजणी नकाशा गुंठा , एकर, हेक्टर, स्क्वेअर फूट, APP DOWNLOAD GPS AREA CALCULATOR Land survey Surveying Website - https://skillinmarathi.com Music - https://www.bensound.com

स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ...

इमेज
स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ... व्हिडीओ पहा काँक्रीट चे बांधकाम असेल तर ते अधिक मजबूत बनवण्यासाठी आपण त्यामध्ये स्टील चा वापर करतो.  हे स्टील बार च्या स्वरूपात वापरले जातात. आपण त्याला आपल्या भाषेत सळी सुद्धा म्हणतो .  काँक्रीट ची लोड  व ताण सहन करण्याची ताकद वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे आपले बांधकाम अधिक मजबूत राहते व दीर्घकाळ टिकते. या स्टीलचे मोजमाप व किंमत ही त्याच्या वजनानुसार केली जाते.  हे मोजमाप क्विंटल  किंवा टन मध्ये करतात. आपल्याला हे स्टील बार  6 mm ,   8 mm ,  10 mm ,  12 mm ,  16 mm ,  20 mm ,  24 mm ,  32 mm , 36 mm ,  40 mm  पर्यंत मिळतात .घरगुती  बांधकामासाठी जास्तीत जास्त 20 mm पर्यंत वापरले जातात. आज आपण या स्टील बारचे लांबीवरून वजन कसे काढायचे हे पाहू. जर आपल्याकडे स्टील बारची जाडी ( व्यास - D ) असेल तर  आपण  त्या बारचे वजन सहजपणे मोजू शकतो आपल्याला वजन काट्यावर जायची गरज नाही. तसेच साईटवर कामासाठी  व अंदाजपत्रक  तयार करण्यासाठी यांचा फायदा होतो. व्हिडीओ पहा

जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?

इमेज
जमिनीची  स्क्वेअर  मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?    यापूर्वी आपण गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी हि माहिती पाहिली होती. त्यामध्ये  जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी? हा प्रश्न खूप  लोकांनी विचारला होता त्यासाठीच हा आजचा लेख व व्हिडिओ बनवलेला आहे . तर चला मग शिकूया आपल्या स्कील  इन मराठी मध्ये .....        जमिनीची मोजणी फुट किंवा मीटर मध्ये करून क्षेत्रफळ चौरस फुट, चौरस मीटर मध्ये आपण काढतो. पण कागदोपत्री जास्त प्रमाणात मेट्रिक पद्धतीचा वापर केला जातो.म्हणजेच मीटर मध्ये मोजणी  करून क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये काढले जाते.जमिनीचे नकाशे ,उतारे ,दस्तऐवज किंवा इतर  कागदपत्रात आपल्याला चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ पाहायला मिळते .पण प्रत्यक्ष व्यवहारात  आपण जमीन चौरस फूट किंवा गुंठ्यामध्ये मोजतो. या माहितीचा  व्हिडीओ पहा आमचे  Youtube  चॅनेल  SUBSCRIBE करण्यासाठी क्लिक करा .    आपण एखाद्याला विचारले कि तुमची जमीन किती आहे ? तर आपल्याला समोरची व्यक्ती  गुंठा किंवा एकर मध्ये सांगते.तसेच बांधकामात सुद्धा स्क्वेअर फुटाचा व

टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculat capacity of water tank |

इमेज
टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculate capacity of water tank |    पाणी साठवण्यासाठी आपण टाकी  ( टॅंक ) चा वापर करत असतो . जितकी  टाकी मोठी असेल तेवढं जास्त पाणी हे आपल्याला माहित आहे.पण या टाकीमध्ये पाणी किती लीटर मावते किंवा टाकी किती लिटरची आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.आता हे चेक करायचं ??? चला तर मग शिकूया ...... आपण टाकीचे बांधकाम करताना किंवा तयार टाकी विकत आणताना आपल्याला  टाकी किती लीटरची पाहिजे यानुसार आपण टाकी घेत असतो.  टाकी लीटर मध्ये चेक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा  टाकीचे   घनफळ घनमीटरमध्ये ( cu.m ) मध्ये काढावे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या टाक्या पाहायला मिळतात पण शक्यतो  चौकोनी म्हणजेच चौरस,  आयताकार ,गोल या आकाराच्या टाक्या आपल्याला जास्त पाहायला मिळतात.टाकीचा जसा आकार असेल त्यानुसार त्याच्या सूत्राने त्याचे घनफळ घनमीटर मध्ये काढावे. 1 घनमीटर मध्ये  1000 लीटर इतके पाणी मावते त्यामुळे  1 घनमीटर = 1000 लीटर हे सूत्र पाठच करा  आपल्याला फक्त टाकीचे जे घनफळ असेल त्याला गुणिले 1000 करायचं आहे  म्हणजे टाकी क

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

इमेज
गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ?   How to measure land in guntha? एक गुंठा म्हणजे किती जमीन ? एकर मध्ये जमीन कशी मोजावी ? हेक्टर म्हणजे किती जमीन ? हे  प्रश्न बऱ्याच जणांना पडले  असतील  कारण आपल्याला हे माहित आहे कि जमीन गुंठ्यामध्ये मोजतो. पण गुंठा म्हणजे नेमकी किती जमीन,गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करायची असते हे फक्त त्या क्षेत्रात काम करणार्यांनाच माहित असते .  जमिनीचा व्यवहार करताना किंवा जमिनीच्या कामासाठी आपल्याला जमिनीचे क्षेत्र ( area ) माहित असणे महत्वाचे असते.महाराष्ट्रात गुंठा हे एकक जमीन मोजणीसाठी जास्त वापरले जाते.  गुंठ्यामध्ये जमीन मोजणी करणे हे काही अवघड काम नाही.कोणीही सातवी - आठवी शिक्षण झालेला माणूस जमीन मोजणी करू शकतो. पण सध्याची परिस्थिती पाहता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना सुध्या ही माहिती नाही. आपण फक्त ७/१२ वर किती गुंठे आहे किंवा  इतरांच्या सांगण्यावरून  आपल्या जमिनीचे  मोजमाप ठरवतो. गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ? आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडीओ पहा    आता गुंठ्यामध्ये जमीन मोजायची कशी हे पाहू  A) जर आप

ब्रास मध्ये वाळू कशी मोजावी ? फक्त 2 मिनिटातच शिका- how calculate sand in Brass

इमेज
आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असणारी माहिती आपल्या  Skill in Marathi  या  Youtube Chanel   वर तसेच आमच्या  https://www.skillinmarathi.com या वेबसाईटवर पोस्ट केली जाते.याचा सर्वांनी लाभ घ्यावा . तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करावी. ब्रास मध्ये वाळू कशी मोजावी? ब्रास मध्ये वाळू ,खडी ,मुरूम ,दगड कसे मोजावे ? पहा आपल्या मराठी मध्ये  Video पहा                                               आमचे  Youtube  चॅनेल  SUBSCRIBE करण्यासाठी क्लिक करा .    आपल्या सर्वाना माहिती आहे की बांधकामाचे कोणतेही काम असो   जसे की RCC ,PCC ( कॉंक्रीट ) , वीट बांधकाम , दगडी बांधकाम , गीलावाकाम  यासारख्या अनेक कामांसाठी   वाळू हे   साहित्य खूप महत्वाचे असते.   ही वाळू दोन प्रकारची असते .   1. नैसर्गिक   ( नदी , समुद्र इ पासून मिळालेली )                                                                                    2. कृत्रिम   ( दगडाचा बारीक चुरा करून तयार केलेली - ग्रीट )   वाळू कोणतीही आपल्याला   हे माहिती आहे कि ती ब्रास मध्ये मोजायची असते.   पण ती ब्र